शशी कपूर यांना वयाच्या १८ व्या वर्षीच करायचं होतं लग्न; पहिल्या भेटीतच जेनिफरच्या प्रेमात पडले

हॅंडसम शशी कपूर यांच्या क्यूट स्माइलवर त्याकाळी मुली फिदा होत असत. पण शशी यांचा जीव जेनिफर केंडाल यांच्यामध्ये अडकला होता.

shashi-kapoor-love-story
(Photo:Indian Express) )

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कपूर खानदानची एक वेगळीच ओळख आहे. दिग्गज अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा शशी कपूर हे सुद्धा वडिलांप्रमाणेच एक उत्तम अभिनेते होते. हॅंडसम शशी कपूर यांच्या क्यूट स्माइलवर त्याकाळी मुली फिदा होत असत. पण शशी यांचा जीव जेनिफर केंडाल यांच्यामध्ये अडकला होता. शशी कपूर हे त्यांचं आणि जेनिफर केंडालसोबतच्या नात्याला खाजगी ठेवणं पसंत करत होते. काही मोजक्याच प्रसंगी शशी कपूर आपल्या प्रेमाबद्दल बोलताना दिसून आले. १९५८ मध्ये शशी आणि जेनिफर यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा कुणाल आणि मुलगी संजना झाली. २०१७ साली शशी कपूर यांच्या निधनापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी जेनिफरसोबतच्या नात्यावर एक खुलासा केला होता. जेनिफर यांना पाहताच क्षणी ते तिच्या प्रेमात पडले होते, अशी कबुली स्वतः शशी कपूर यांनी दिली होती.

१८ वर्षातच लग्नासाठी तयार होते शशी कपूर

शशी कपूर जेव्हा जेनिफर यांना आपली अर्धांगिनी बनवणार होते त्यावेळी त्यांचं वय केवळ १८ वर्ष इतकंच होतं. शशी यांचं ते वय लग्नायोग्य नाही असं त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांना सुद्धा वाटलं होतं. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शशी म्हणाले होते की, ज्यावेळी जेनिफरला पहिल्यांदा पाहिलं होतं, त्यावेळी माझं वय केवळ १८ वर्ष इतकं होतं. त्याच क्षणी मला लग्न करायचं होतं. हे ऐकून माझ्या आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. तू अजुन फक्त १८ वर्षाचाच आहेस, असं त्यावेळी माझे आई-वडील सुद्धा म्हणत होते. आई-वडिलांच्या म्हणण्यावरून मग मी वाट पाहिल असं म्हणालो होतो. त्यानंतर मी दोन वर्षे वाट पाहिली. दोन वर्षांनी माझ्या आई-वडिलांनी मला विचारलं, “अजुनही तुला लग्न करायचं आहे का?” मी हो म्हणालो आणि आमचं लग्न झालं.

 

जेनिफर यांच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं नाही

शशी कपूर आणि जेनिफर यांची जोडी आणि नातं खूपच प्रेमळ होतं. अखेरच्या क्षणापर्यंत शशी कपूर यांनी जेनिफर यांच्यावरंच प्रेम केलं. १९८४ मध्ये जेनिफर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने शशी कपूर खूप एकटे पडले होते. पत्नी जेनिफरच्या निधनानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. ज्या ज्या वेळी त्यांना दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं त्या प्रत्येक वेळी ते एकच वाक्य म्हणत होते, “जेनिफर यांच्यासारखी दुसरी आणखी भेटणार नाही.”

शशी कपूरने जेनिफर यांच्यावर केलं खरं प्रेम

२०१२ मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर म्हणाला होता की, “आई जेनिफर यांच्या निधनाला २८ वर्षे झाली तरी अद्याप ते या दुःखातून बाहेर आले नाहीत. ज्यावेळी आई जेनफिर यांचं निधन झालं त्यावेळी त्या ५० वर्षाच्या होत्या आणि वडील शशी कपूर हे ४६ वर्षाचे आहेत. त्यांच्या मनात असतं तर ते लग्न करू शकले असते. पण त्यांनी फक्त आई जेनिफर यांच्यावरच प्रेम केलं. ते खरे जीवनसाथी होते. प्रत्येक नात्यात खटके उडत असतात, पण त्या दोघांचं नात काही वेगळंच होतं. त्याचं जस जसं जुनं होत गेलं तस तसं त्यांच्यातलं प्रेम आणखी वाढत गेलं.”

बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या आजारपणामुळे अखेर शशी कपूर यांचं ४ डिसेंबर २०१७ रोजी निधन झालं. आता त्यांचा नातू जहान कपूर फिल्म इंडस्ट्रीत आपले पाय रोवायला सुरूवात करतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shashi kapoor wanted to marry with jennifer kendal at 18 but prithviraj kapoor felt he was too young prp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या