आजचा तंत्रज्ञानाचा वेग अफाट आहे आणि आजच आपले पोलीस सुद्धा माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर आणि तांत्रिक माहिती पुरविण्यासाठी आवश्यक अद्ययावत प्रणालीने सुसज्ज आहेत. पण पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. १९८० च्या काळात जेव्हा अनेक प्रकारचे गुन्हे घडत असत तेव्हा पोलिसांना ते सोडवण्यासाठो स्वतःची हुशारी आणि खबऱ्यांचे नेटवर्क यावरच अवलंबून राहावं लागायचे. या काळात अमीरजादा नावबखान हा कुविख्यात गुंड चरस गांजा यांच्या तस्करीमध्ये असायचा. त्या काळात अमीरजादाच्या पठाण गँगचा मोठा दबदबा होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते पण कोणही त्याच्या विरुद्ध उभं राहायला तयार नसायचा. त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांमध्ये खबऱ्यांचे अतिशय उत्कृष्ट नेटवर्क असलेला अत्यंत हुशार असा पोलीस अधिकारी इसाक बागवान हा क्राईम ब्रँचच्या टीम मध्ये होता. जेव्हा दिलीप कुमार यांच्या शक्ती सिनेमाचे निर्माता मुशीरभाईं यांच्या किडनॅपिंगची केस क्राईम ब्रँचच्या टीमने स्वीकारली. तेव्हा इसाक बागवान याना,  ही केस देण्यात आली. अत्यंत हुशारीने इसाक बागवान यांनी अमीरजादा आणि त्यांच्या साथीदारांना एक एक करून आपल्या जाळ्यात अडकवले. त्या काळात ना मोबाईल होते ना जीपीस होते. मात्र, बागवानांची गुन्ह्याची उकल काढताना विचार करण्याची पद्धत, त्यांची हुशारी आणि खबऱ्यांच नेटवर्क यामुळेच ते अमीरजादाच्या प्रत्येक जागेवर पोहचायचे. पण नेहमीच तो निसटून जायचा आणि मात्र शेवटी त्यांनी अमीरजादाला शोधले आणि जेरबंद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमीरजादा केस गाजली कारण भरकोर्टात मान्यवर माननीय न्यायमूर्तींच्या डोळ्यादेखत अमीरजादावर डेव्हिड या मारेकऱ्याने बंदुकीने घातलेल्या गोळ्या आणि त्यांनतर मारेकऱ्याला पकडताना बागवान यांनी दाखवलेलं प्रसंगावधान, हे थरार नाट्य हे सुद्धा मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासातील पहिली घटना होती. भर कोर्टातून जर मारेकरी पळून गेला असता तर पोलीस खात्याचीच नव्हे तर न्याय देवतेची अब्रू सुद्धा वेशीवर टांगली गेली असती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaurya serial second episode on amirzada don case
First published on: 02-12-2016 at 08:27 IST