scorecardresearch

Video: वर्कआऊट करताना शिल्पा शेट्टी झाली बेशुद्ध? व्हिडीओ चर्चेत

शिल्पाने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि फिटनेससाठी विशेष ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेशुद्ध असल्याचे भासत आहे.

शिल्पा सतत जीममध्ये वर्कआऊट करतानाचे, योग, मेडिटेशन करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने जानेवारी २०२२च्या शेवटच्या दिवशी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती वर्कआऊट करुन बेशुद्ध झाल्याचे भासवत आहे. त्यानंतर मजेशीर अंदाजात ती कॅमेरा ट्रेनरकडे करते. ती ट्रेनर देखील हसते. व्हिडीओच्या शेवटी शिल्पा उठते आणि म्हणते, ‘मंडे मोटीवेशन… मारुन टाकलं.. अल्लाह…’
Video: तेजस्वीच्या ‘आंटी’ कमेंटवर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने, ‘आजचे फिटनेश सेशन जानेवारी माहिन्याइतके मोठे होते. महिन्याच्या शेवटी, स्वत:ला प्रोत्साहन द्या, मॅटवर पडून रहा आणि स्वत:ला नवीन महिन्याच्या सुरुवातीसाठी मानसिकदृष्ट्या तयार करा. पण तुम्हा सर्वांचे प्रेम मला प्रेरित करते.. मग मी पुन्हा कामाला लागते’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shilpa shetty funny workout video seen lying down says maar daala avb

ताज्या बातम्या