‘बिग बॉस मराठी २’ हा शो संपल्यानंतरही शिव ठाकरे व वीणा जगताप यांची जोडी तुफान चर्चेत आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यात फार उत्सुकता आहे. वीणाने अलिकडेच तिच्या हातावर शिवचे नाव कोरत त्याला वाढदिवसाची भेट दिली होती. त्यानंतर आता दोघांचा एक टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
शिव आणि वीणा यांनी पहिल्यांदाच एक टिकटॉक व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडीओ शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिव “प्यार तुझे करता हूँ देख मेरे आँखों में” या गाण्यातून वीणाकडे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असुन काही तासात लाखो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिव ठाकरे हा ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता आहे. तर वीणाने या शोमध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. पण शो जिंकण्यासाठी हा दोघांनी केलेला पब्लिसिटी स्टंट मानला जात होता. मात्र शिव-वीणा या चर्चा खोट्या ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. शो संपल्यानंतरही हे दोघं कायम एकमेकांच्या संपर्कात असून प्रत्येक अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत आहेत.