scorecardresearch

“पुष्पानंतर आता…” अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मुलाखतीदरम्यान खुलासा

अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याला आवाज देणाऱ्या श्रेयस तळपदेचंही प्रचंड कौतुक झालं

“पुष्पानंतर आता…” अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मुलाखतीदरम्यान खुलासा
श्रेयस तळपदे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चांगलाच गाजला असून आता तो चित्रपट रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. कोविड काळात या चित्रपटाने ओटीटी आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची कथा, त्यातील संवाद, गाणी सगळंच लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. अल्लू अर्जुनच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. त्याबरोबरच या ‘पुष्पा’ला हिंदीत आवाज देणाऱ्या आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचीही खूप प्रशंसा झाली.

२०२१ च्या ‘पुष्पा – द राईज’च्या हिंदी भाषेत अल्लू अर्जुनला श्रेयस तळपदे याने आवाज दिला होता. यातील प्रत्येक संवाद जबरदस्त हीट ठरला, त्यावर असंख्य मीम आणि रिल्सदेखील बनवले गेले. एकूणच श्रेयसचा आवाज सगळ्यांनाच भावला. या अनुभवाबद्दल आणि डबिंगच्या नंतर आलेल्या ऑफर्सबद्दल श्रेयसने नुकतंच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

आणखी वाचा : जेव्हा रजनीकांत म्हणाले अक्षय कुमार हाच खरा हीरो; ‘रोबोट २.०’ दरम्यान सुपरस्टारने केला होता खुलासा

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार या मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला, “एखादा चित्रपट तुमचं करिअर कुठे घेऊन जाईल याची तुम्हालाही कल्पना नसते. मी ‘पुष्पा’मध्ये पडद्यावर दिसलो नव्हतो तरी प्रेक्षकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला या चित्रपटाचा भाग होता आलं. ‘पुष्पा’नंतर माझ्याकडे डबिंगसाठी भरपूर ऑफर्स आल्या आहेत, पण मी त्यातील काही मोजक्याच प्रोजेक्टवर काम करणार आहे. मध्यंतरी मी ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी आवाज दिला, आता ‘पुष्पा २’साठी मला संधी मिळेल अशी आशा व्यक्त करतो.”

याबरोबरच दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुनबद्दलही या मुलाखतीमध्ये श्रेयस भरभरून बोलला. तो म्हणाला, “अल्लू अर्जुन हा माझा अत्यंत आवडता नट आहे. त्याच्या या चित्रपटाच्या सीरिजचा भाग होता आलं हा अनुभवच खूप समृद्ध करणारा आहे. त्याच्या अभिनयाला सलाम आणि दिग्दर्शक सुकुमार यांनादेखील. श्रेयस नुकताच ‘कौन प्रवीण तांबे’ या बायोपिकमध्ये झळकला. तसंच तो कंगनाच्या ‘एमर्जन्सि’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:13 IST

संबंधित बातम्या