मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्याची ही गुडन्यूज ऐकल्यानंतर चाहतेही फार खूश झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आणि त्याची पत्नी मिताली दिसत आहे. यावेळी त्या दोघांच्याही अंगठ्याला शाई लागल्याची दिसत आहे. यासोबत त्याने मुंबईत नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली आहे. सिद्धार्थने हा फोटो शेअर करताना त्याला हटके कॅप्शनही दिले आहे.
“एक नवी सुरुवात… मुंबईतील आमचे पहिले घर”, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्यासोबत त्याने #tinypandahouse असा हॅशटॅगही शेअर केला आहे. त्याची ही गुडन्यूज ऐकल्यानंतर चाहतेही फार खूश झाले आहेत.
दरम्यान सिद्धार्थ आणि मितालीने त्यांचे मुंबईतील नवीन घर नेमकं कोणत्या परिसरात खरेदी केलं? याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांनी हे घर किती रुपयांना खरेदी केले याचीही माहिती अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्याच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर ‘खूप खूप शुभेच्छा’, ‘अभिनंदन’ अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.
“प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात एकदा तरी…”, हेमांगी कवीने व्यक्त केली ‘ती’ इच्छा
दरम्यान सिद्धार्थ चांदेकर याची प्रमुख भूमिका असलेला झिम्मा हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास जोशी हे प्रसिद्ध कलाकार झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं होतं. त्यासोबत स्टार प्रवाहावरील “सांग तू आहेस ना ?” या मालिकेतही तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.