“बाबा, अब सब आप के हाथ में है…”; सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ साठी प्रेक्षक खूपच उत्सुक झालेत. यात सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टने प्रेक्षकांच्या उत्साहात आणखी भर पडलीय.

sidharth-chandekar-post

गेल्या वर्षी चर्चेत राहिलेली अभिनेत्री प्रिया बापटची ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली. राजकीय घराणं, या कुटूंबापासून दूर असलेले राजकीय वारसदार आणि त्यांच्यात सुरू असलेली राजकीय चढाओढ या भोवती फिरणाऱ्या या वेब सीरिजने अनेकांची मनं जिंकली. अभिनेत्री प्रिया बापटसह अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अतुल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजचा दुसरा सीजन भेटीला येत असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीय. प्रेक्षकांप्रमाणेच यातील कलाकार सुद्धा ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ साठी उत्सुक झालेत. मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपली उत्सुकता व्यक्त केलीय. त्याने शेअर केलेला फोटो पाहून त्याचे फॅन्स सुद्धा ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ मध्ये काय कहाणी असणार? याचा अंदाज बांधण्यास सुरूवात केलीय.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या पहिल्या सीजनला मिळालेल्या यशानंतर या सीरिजचा दुसरा सीजन ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शीत या सीरिजमध्ये मुलगी आणि वडील यांच्यात सत्तेचा खेळ कसा रंगतो हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच लॉंच केलेल्या या दुसऱ्या सीजनचा ट्रेलर पाहून प्रेक्षक पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. अशात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने एक पोस्ट शेअर प्रेक्षकांची ही उत्सुकता आणखी वाढवलीय.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केलीय. यात त्याने ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ मधील एका सीनचा फोटो शेअर केलाय. सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेल्या खेळात कहाणीतील वडीलांच्या डावपेचामुळे नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. सिद्धार्थने याच सीनचा फोटो शेअर करत एक हटके कॅप्शन सुद्धा लिहिलीय. “बाबा, अब सब आप के हाथ में है. ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ येत्या ३० जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर स्ट्रीम होतोय…” असं लिहित सिद्धार्थने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलीय.

‘सिटी ऑफ ड्रीम्स २’मध्ये बाप आणि मुलीत सुरु असलेला लढा पाहायला मिळणार आहे. अमेय राव गायकवाड जिंकणार की पोर्णिमा गायकवाड यांच्यात होणाऱ्या लढा दाखवण्यात येणार आहे. तर, सत्तेपुढे नाती कशी छोटी होतात हे आपल्याला त्याता पाहायला मिळणार आहे. एखादा राजकारणी सत्तेच्या लालसेपोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि त्याची मुलगी त्याला कशी जोरदार टक्कर देते, हे या सीरीजमध्ये दाखवलं जाणार आहे. निवडणुकीच्या तयारीत असताना बाप आणि मुलगी अनेकांचे प्राण धोक्यात घालतात. पोर्णिमा महाराष्ट्राची तात्पुरती मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र जन शक्ती पक्षाची प्रमुख असल्याचे दिसते. पोर्णिमाला वसीम खान आणि माझी प्रदेश प्रमुख जगदीश गुरव मदत करतात.

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुन्नूर यांनी केले आहे. तर रोहित बनवलीकर आणि आणि नागेश कुकनूर यांनी सहलेखन केले होते. ही सीरिज ३० जुलैला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार.

 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटची ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही गाजलेली वेब सीरिज आहे. या सीरिजचा आता दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला सीझन हा दमदार अभिनय आणि राजकीय नाट्यामुळे प्रचंड गाजला होता. त्यानंतर प्रेक्षक हे दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टमुळे प्रेक्षकांचा आनंद हा शिगेला पोहोचला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Siddharth chandekars post on city of dreams season 2 prp