प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आज या जगात नाही. मात्र त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत तो कायम आहे. नुकतंच सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी त्याचे हितचिंतक आणि चाहत्यांसाठी एक स्टेटमेंट प्रसिद्ध करत त्यांना विनंती केली आहे. याशिवाय सिद्धार्थची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिलनं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या स्टेटमेंटमध्ये सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी त्याच्या चाहत्यांना त्याचा कोणताही फोटो किंवा त्याचं नाव कोणत्याही कार्यक्रमात वापरण्याआधी एकदा कुटुंबीयांना विचारण्याची विनंती केली आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलंय, ‘सिद्धार्थ शुक्लाच्या हितचिंतक आणि चाहत्यांना आम्ही त्याचे कुटुंबीय म्हणून विनंती करु इच्छितो. आशा करतो की तुम्ही आमच्या विनंतीचा आदर कराल, सिद्धार्थनं आता आपल्यात नाही. त्यामुळे तो आता त्याचे निर्णय घेऊ शकत नाही. पण तो आमच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि नेहमीच आमच्या आठवणी जिवंत राहील. आम्ही त्याच्या इच्छांसोबत जगत आहोत.’

सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिलं, ‘आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की, सिद्धार्थ शुक्लाचं नाव किंवा त्यांचा चेहरा कोणत्या प्रोजक्टमध्ये वापरायचा असेल तर त्याआधी एकदा आम्हाला विचारा. आम्हाला सिद्धार्थची आवड आणि निवड दोन्ही माहीत आहे. तो आज आम्हा सर्वांसोबत असता तर त्यानं काय केलं असतं हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे त्याच्या इच्छांचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकतो. एखाद्या प्रोजेक्टबाबात तो खूश नव्हता तर आम्हाला माहीत आहे की, त्याच्या प्रदर्शनाबाबतही तो खूश असणार नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सिद्धार्थ शुक्लाचं सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्याच्या कुटुंबीयांसोबत इतर सर्वांसाठीच त्याचं असं अचानक जाणं धक्कादायक होतं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज गिल देखील बरेच दिवस दुःखात होती. मात्र आता ती यातून सावरत असून सोबत सिद्धार्थच्या कुटुंबीयांचीही काळजी घेताना दिसत आहे.