scorecardresearch

‘इंडियन पुलिस फोर्स’च्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत, व्हिडीओ आला समोर

‘इंडियन पुलिस फोर्स’ वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे.

sidharth malhotra rohit shetty, indian police force
'इंडियन पुलिस फोर्स' वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका रुपेरी पडद्यावर अगदी उत्तमरित्या साकारतो. आपल्या अभिनयाच्या जोरावरच तो आजवर इथपर्यंत पोचला. आपली भूमिका प्रेक्षकांना आपल्यातली वाटावी म्हणून तो हवी ती मेहनत घेत असतो. सध्या तो ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसीरिजचं चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे.

‘इंडियन पुलिस फोर्स’ वेबसीरिजचं चित्रीकरण सध्या गोव्यामध्ये सुरु आहे. रोहित शेट्टी या वेबसीरिजचं दिग्दर्शन करत आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यानेच सिद्धार्थला दुखापत झाली असल्याचं त्याने फोटो शेअर करत सांगितलं आहे. एक्शन सीनचं चित्रीकरण करत असताना त्याला ही दुखापत झाली आहे. सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हाताला झालेल्या दुखापतीचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – पूजा हेगडेने का घातलं सलमान खानचं ब्रेसलेट? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

आपल्या हाताला झालेली जखम दाखवताना त्याने रोहित शेट्टीबरोबर सेल्फी शेअर केला आहे. “रोहित शेट्टीचा एक्शन हिरो म्हणजे घाम आणि खरं रक्त. रोहित सर अशाच एका एक्शन सीक्वेन्ससाठी काम करत आहेत.” असं सिद्धार्थने पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी एक्शन सीन्सचं शूट करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Photos : तेजस्विनी पंडितचे आजवरचे सगळ्यात हॉट लूक, मराठीमधील सर्वात बोल्ड सीरिजमध्येही करतेय काम

रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या या सीरिजची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. या वेबसीरिजमध्ये शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय देखील मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबरीने सिद्धार्थ ‘मिशन मजनू’ या चित्रपटामध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sidharth malhotra hurt on rohit shetty series indian police force set fans show concern and photos video viral on social media kmd