सिद्धार्थ शुक्लाला डॉक्टरांनी ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं मात्र…

रुग्णालयात पोहचण्याआधीच सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

sidharth-shukla-deadl
(Photo-Instagram@sidharthshukla)

अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले आहे. तो ४० वर्षांचा होता. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याची माहिती कूपर रुग्णालयातून देण्यात आली आहे. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीनंतर मालिका विश्वासह देशाभरातील त्याच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जातोय.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला असल्याचं डाक्टरांनी सांगितलं. सिद्धार्थ शुक्ला फिटनेटप्रेमी होता. शिवाय तो नियमित वर्कआउट करायचा. फिट असूनही सिद्धार्थचं निधन झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र असं असलं तर सिद्धार्थ शुक्लाला डॉक्टरांनी काही सल्ला दिला होता. सिद्धार्थ शुक्लाच्या फॅमिली डॉक्टरांनी त्याला वर्कआऊट कमी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर देखील सिद्धार्थ दररोज ३-४ तास वर्कआउट करत होता.

हे देखील वाचा: आधी दोन वेळा सिद्धार्थ शुक्लाने दिला होता मृत्यूला चकवा पण यावेळी…, काय घडलं होतं नेमकं?

सिद्धार्थचा मित्र राहुल महाजनने देखील सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो म्हणाला, “मी आणि सिद्धार्थ एकाच जिममध्ये होतो. चो खूप फिट होता. जिममध्ये देखील आम्ही फिटनेसवर अनेकदा चर्चा करायचो. सिद्धार्थ शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे फिट होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)


काय घडलं होतं आदल्या दिवशी

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला बुधवारी दुपारी एका प्रोजेक्टच्या मिटिंगसाठी गेला होता. रात्री जवळपास साडे आठ वाजता तो घरी पोहचला. त्यानंतर तो बिल्डिंगमधील कंपाउंडमध्ये जॉगिंगसाठी गेला. जवळपास रात्री साडेदहा वाजता तो घरी परतला. त्यानंतर त्याने जेवण केलं. सूत्रांच्या माहितूनुसार जेवण करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो झोपी गेला. पहाटे जवळपास ३ वाजता सिद्धार्थ अस्वस्थ वाटत असल्यामुळे उठला यावेळी छातीत दुखत असल्याचं त्याने आईला सांगितलं. आईने त्याला पाणी दिलं. पाणी पिऊन सिद्धार्थ पुन्हा झोपला मात्र त्यानंतर तो उठलाच नाही. पहाटे पाच वाजता रिता शुक्ला उठल्या तेव्हा त्यांना सिद्धार्थ हालचाल करत नसल्याचं जाणवलं. त्यांनी मुलींना म्हणजेच सिद्धार्थच्या बहिणींना बोलावलं. सिद्धार्थ ज्या इमारतीत राहतो तिथेच त्या राहत असल्याने त्या त्वरित आल्या.

पहा फोटो: फिटनेसफ्रीक, हॅण्डसम अन्… अशी होती ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची लाइफस्टाइल

फॅमिली डॉक्टरांनी दिली रुग्णालयात नेण्याचा सल्ला

सिद्धार्थ शुक्लाच्या बहिणींना देखील काही तरी विचित्र जाणावलं. त्यांनी लगेचच त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावून घेतलं. सकाळी जवळपास सात वाजता डॉक्टरांनी त्याला कूपर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. साडे आठ वाजचा अॅम्ब्युलन्समधून सिद्धार्थला रुग्णालयात नेण्यात आलं. साडे नऊ वाजता सिद्धार्थचं कुटुंब त्याला रुग्णालयात घेऊन पोहचलं. इथं डाक्टरांनी तपासल्यानंतर साडे दहा वाजता डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केलं. शिवाय रुग्णालयात पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं.

सिद्धार्थच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ शुक्लाला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sidharth shukla death doctors advised him go slow on his exercise and workout kpw