सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा हा रिपोर्ट आला. याआधी पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते.

१६ मार्च रोजी कनिकामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसून येऊ लागली होती आणि २० मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

आणखी वाचा : ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला करोनाची लागण

कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती डिनर पार्टीला गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.