सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी अगदी थिरकायला लावणारी असतात. आपल्या कामामुळे मिका सतत चर्चेत असतो. त्याशिवाय मिकाचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राखी सावंतबरोबर त्याचा झालेला वाद तर जगजाहिर आहे. पण सध्या चर्चा रंगत आहेत ती त्याच्या लग्नाची. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणारे व्हिडीओ पाहून मिका गुपचूप लग्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिकाचा हा व्हिडीओ पंजाब येथे असणाऱ्या त्याच्या रोपर या गावामधील आहे. गावामध्ये मिका प्रवेश करताच नवरी मुलगी त्याचं जंगी स्वागत करते. तसेच मिका देखील नाचू लागतो. असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मिका गुपचूप लग्न करत असल्याचं हा व्हिडीओ पाहून चर्चा होत असली तरी यामध्ये काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. मिका त्याचा आगामी शो ‘स्वयंवर – मिका दी वोहटी’साठी एक म्युझिक व्हिडीओ शूट करत आहे. त्याचदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीला झालंय काय? ब्लाऊज न घालताच नेसली साडी, नेटकरी म्हणाले…

मिकाने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रीकरणादरम्यानचे व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करताना त्यानं म्हटलं की, “रोपरमध्ये चित्रीकरण करून मला फार आनंद झाला. नव्या प्रवासाची सुरुवात अशा पद्धतीने होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ‘स्वयंवर – मिका दी वोहटी’ या शोच्या माध्यमातून मी माझ्या जोडीदाराचा शोध घेणार आहे. लवकरच हा शो स्टार भारत वाहिनीवर प्रसारित होईल.”

आणखी वाचा – VIDEO : नोरा फतेहीवर आली दुचाकीवरुन प्रवास करण्याची वेळ, पाहा नेमकं काय घडलं?

मिकाचं बालपण हे पंजाबमधील रोपर या गावीच गेलं. त्याच्या या गावाशी बऱ्याच आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हा म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी जेव्हा मिका लोकेशन शोधत होता तेव्हा हेच गाव त्याच्या डोळ्यासमोर आलं. याआधी राखी सावंत, रतन राजपूत, राहुल महाजन या मंडळींचं छोट्या पडद्यावर स्वयंवर झालं होतं. आता मिकाही याच मंडळींच्या पावलांवर पाऊल ठेवताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer mika singh secret marriage at his village in punjab and his video viral on social media kmd
First published on: 05-05-2022 at 14:08 IST