अनिल कपूरच्या दोन्ही मुली सोनम आणि रिया सध्या दिल्लीत ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तर दुसरीकडे एका तरुणाने या दोघींच्या नावाचा टॅटू आपल्या पाठीवर गोंदवलाय. हा तरुण दुसरा कोणी नसून सोनम आणि रियाचा भाऊ हर्षवर्धन कपूर आहे. ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला हर्षवर्धन आपल्या दोन्ही बहिणींवर खूप प्रेम करतो आणि सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये तो टी-शर्ट घालताना पाहायला मिळतोय. यावेळी त्याच्या पाठीवर गोंदवलेली सोनम आणि रिया ही नावं स्पष्टपणे दिसत आहेत.

हर्षवर्धनने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मी सुट्टीवर जातोय, त्यामुळे हेच बोलणं योग्य असेल की ‘मी लवकरच परत येईन.” हा व्हिडिओ जुना असल्याने हर्षने त्यावर थ्रोबॅक #thowback असा हॅशटॅग दिलाय.

वाचा : समंथाने मला राखी बांधण्याची धमकी दिलेली- नागा चैतन्य

अनिल कपूर जिथे स्वत: चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत, तिथे त्यांची तिन्ही मुलं बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. हर्षवर्धन आणि सोनम अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच रिया, अनिल कपूर यांच्या प्रॉडक्शन हाऊसचं काम सांभाळतेय. याच प्रॉडक्शन हाऊसकडून ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची निर्मिती केली जातेय, ज्यामध्ये करिना कपूर खान लग्नानंतर पुनरागमन करताना दिसणार आहे.