इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुकवर एखादं गाणं गाजलं की, त्याची जोरदार चर्चा रंगताना दिसते. बरेच सोशल मीडिया स्टार एखाद्या गाजलेल्या गाण्यावरच रिल व्हिडीओ बनवताना दिसतात. मध्यंतरी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होत होतं. या गाण्यावर अनेकांनी रिल व्हिडीओ तयार केले होते. आता एक नवं गाणं चर्चेत आलं आहे. ‘दबक्या पावलांनी आली’ हे गाणं सध्या प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.

‘दबक्या पावलांनी आली’ गाण्यावर आतापर्यंत अनेकांनी रिल व्हिडीओ तयार केले आहेत. आता रील स्टार किली पॉलला आणि त्याची बहिण निमा पॉल हिलाही या गाण्याची भूरळ पडली आहे. नुकतंच त्यांनी या गाण्यावर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. पारंपरिक वेशभुषा करत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला अधिकाधिक पसंती मिळत आहे.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

डोक्यावर फेटा, सदरा, पायजमा किली पॉलने परिधान केला आहे. तर त्याची बहिण निमा पॉलने लेहेंगा आणि आकर्षक दागिने घातले आहेत. तसेच या त्यांच्या या रिल व्हिडीओमधील दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव विशेष लक्षवेधी आहेत. इतकंच नव्हे तर किली पॉल या व्हिडीओमध्ये स्वतः हे गाणं गाताना दिसत आहे. “एक उत्कृष्ट गाणं” असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किली पॉल अनेक भारतीय गाण्यावर रील बनवत असतो. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. ‘दबक्या पावलांनी आली’ या त्याच्या रिल व्हिडीओवर अनेक मराठी प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. ‘जय महाराष्ट्र’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “भाऊ तू आमचं मन जिंकलं. जय महाराष्ट्र”, असं म्हटलं आहे.