scorecardresearch

Premium

Video : फेटा, सदरा, पारंपरिक लूक अन्…; ‘दबक्या पावलांनी आली’ गाण्यावर किली पॉलचा भन्नाट डान्स, रिल व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘दबक्या पावलांनी आली’ गाण्यावरील किली पॉलचा रिल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ चर्चेत

Kill Paul Neema Paul
'दबक्या पावलांनी आली' गाण्यावरील किली पॉलचा रिल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ चर्चेत

इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुकवर एखादं गाणं गाजलं की, त्याची जोरदार चर्चा रंगताना दिसते. बरेच सोशल मीडिया स्टार एखाद्या गाजलेल्या गाण्यावरच रिल व्हिडीओ बनवताना दिसतात. मध्यंतरी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होत होतं. या गाण्यावर अनेकांनी रिल व्हिडीओ तयार केले होते. आता एक नवं गाणं चर्चेत आलं आहे. ‘दबक्या पावलांनी आली’ हे गाणं सध्या प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.

‘दबक्या पावलांनी आली’ गाण्यावर आतापर्यंत अनेकांनी रिल व्हिडीओ तयार केले आहेत. आता रील स्टार किली पॉलला आणि त्याची बहिण निमा पॉल हिलाही या गाण्याची भूरळ पडली आहे. नुकतंच त्यांनी या गाण्यावर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. पारंपरिक वेशभुषा करत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला अधिकाधिक पसंती मिळत आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

डोक्यावर फेटा, सदरा, पायजमा किली पॉलने परिधान केला आहे. तर त्याची बहिण निमा पॉलने लेहेंगा आणि आकर्षक दागिने घातले आहेत. तसेच या त्यांच्या या रिल व्हिडीओमधील दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव विशेष लक्षवेधी आहेत. इतकंच नव्हे तर किली पॉल या व्हिडीओमध्ये स्वतः हे गाणं गाताना दिसत आहे. “एक उत्कृष्ट गाणं” असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

किली पॉल अनेक भारतीय गाण्यावर रील बनवत असतो. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. ‘दबक्या पावलांनी आली’ या त्याच्या रिल व्हिडीओवर अनेक मराठी प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. ‘जय महाराष्ट्र’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “भाऊ तू आमचं मन जिंकलं. जय महाराष्ट्र”, असं म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social media star kill paul and his sister neema paul dance on marathi popular song see reel video kmd

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×