अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी शुक्रवारी तान्हुलीचं आगमन झालं. ट्विटरच्या माध्यमातून कुणालने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. ‘आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आजच्या शुभदिवशी आमच्या घरी मुलीचा जन्म झाला. तुमच्या प्रेम आणि आशिर्वादासाठी खूप खूप धन्यवाद,’ असं ट्विट कुणालने केलं होतं. सोहा, कुणालने आपल्या मुलीचं नाव इनाया नौमी खेमू असं ठेवलं आहे.

‘इनाया नौमी खेमू असं आम्ही आमच्या मुलीचं नाव ठेवलं आहे. इनाया खूश आहे आणि तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशिर्वादासाठी तिने आभार मानले आहेत,’ असं ट्विट कुणालनं केलं. पहिल्यांदाच आई-बाबा झालेले सोहा आणि कुणाल सध्या खूप आनंदात आहेत. २७ सप्टेंबर रोजी सोहाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी तिने मुलीला जन्म दिला.

PHOTO : हैदराबादमध्ये ‘बाहुबली’ टीमसोबत रविनाची पार्टी

जुलै २०१४ मध्ये कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये दोघांनी लग्न केलं. सोहा गरोदर असल्याची बातमीही कुणालने ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली होती. डिसेंबर महिन्यात तैमुरचा जन्म आणि आता सोहाने दिलेल्या या गूड न्यूजमुळे खान कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.