बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आगमी चित्रपट ‘खानदानी शफाखाना’चा ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. ‘खानदानी शफाखाना हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, अनु कपूर आणि रॅपर बादशाह हे झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता करत आहेत’ असे ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे.
New release date… #KhandaaniShafakhana will now release on 2 Aug 2019… Stars Sonakshi Sinha, Varun Sharma, Annu Kapoor and singer Badshah… Directed by Shilpi Dasgupta. pic.twitter.com/Mksc5QrfHq
— taran adarsh (@taran_adarsh) June 27, 2019
‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात एका अनोख्या पद्धतीने लैगिंक समस्येवर भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान चित्रपटात अभिनेता वरुण सोनाक्षीच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. सोनाक्षीचा मामा खानदानी शफाखाना सोनाक्षीच्या नावावर करतो. त्यानंतर सोनाक्षी लैगिंक समस्यांवर औषधे विकण्यास सुरुवात करते. परंतु सामाजात कोणीही या समस्यांवर उघडपणे बोलण्यास तयार नसते. समाजाने या समस्यांवर उघडपणे बोलण्यासाठी सोनाक्षी प्रयत्न करताना दिसते.
या चित्रपटात रॅपर बादशाह देखील झळकणार असून त्याचे कोका हे गाणे आहे. या गाण्यात सोनाक्षी अत्यंत ग्लॅमरल अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता करणार असून हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.