बॉलिवूडसाठी २०१६ ची सुरुवात म्हणावी तशी खास नव्हती. अनेक बॉलिवूड जोडप्यांचे घटस्फोट झाले. पण आता असे वाटत आहे की २०१७ च्या सुरुवातीला अनेक बॉलिवूड कलाकारांचे साखरपुडे आणि कदाचित लग्नही होतील.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ म्हणजे सोनाक्षी सिन्हा २०१७ च्या सुरुवातीला साखरपुडा करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाक्षी, बंटी सचदेहला डेट करत आहे. बंटीचा आधी एक घटस्फोट झाला आहे. सोनाक्षीला बंटी आणि त्याच्या कुटुंबियांसोबत अनेक कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले आहेत. असे असले तरी सोनाक्षीने अजूनही तिच्या या नात्याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.

कधी होईल साखरपुडा
मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि प्रियकर बंटी सजदेह लवकरच साखरपुडा करणार आहेत. साखरपुड्याची तारीख अजूनपर्यंत ठरली नसली तरी साखरपुडा पुढच्यावर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. जवळच्या मित्र परिवारामध्येच हा साखरपुडा पार पडणार आहे.

बंटी सीएसई कंसल्टिंग कंपनीचा एक भागिदार आहे. विराट कोहली त्याच्या फार जवळचा मित्र असून या कंपनीमध्ये विराटचेही काही शेअर्स आहेत. सिनेसृष्टीत बंटीची ओळख खेळ आणि सेलिब्रेटींचा मॅनेजर म्हणून आहे. असे म्हटले जाते की, बंटीने २०१२ पासून सोनाक्षीचे जाहिरातींचे डील पाहणे सुरु केले होते. तेव्हा पासूनच ते एकमेकांना डेट करत आहेत. बंटी हा सोहेल खानची पत्नी सीमा सजदेहचा भाऊ आहे.

बंटीने २००९ मध्ये अंबिका चौहानसोबत गोव्यात लग्न केले होते. त्यांच्या या लग्नात सलमान खाननेही हजेरी लावली होती. पण त्यांचे हे नाते चार वर्षांनंतर तुटले. अंबिका स्वतः क्रिकेटर युवराज सिंगची मॅनेजर होती. सोनाक्षीच्या आधी बंटीचे नाव सुश्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धूपिया, समिरा रेड्डी यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.