बॉलीवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच ‘हॉलीडे’ या चित्रपटात झळकली होती. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारी सोनाक्षी आता ए आर मुरुगदोसच्या अॅक्शनपटासाठी मार्शल आर्टचे धडे घेत आहे.
गजनी चित्रपट दिग्दर्शक मुरुगदोसने महिलांवर आधारित अॅक्शनपट काढायचे ठरवले आहे. यात शॉटगन ज्युनिअर म्हणजेच सोनाक्षी काही अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसेल. त्याकरिता तिला मार्शल आर्टमध्ये निपुण होण्याची गरज आहे. चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होण्यापूर्वी सोनाक्षी ३० दिवसांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेणार आहे. याबाबात चित्रपट समीक्षक तरन आनंदने ट्विट केले आहे. मुरुगदोसच्या या चित्रपटात सोनाक्षी मुख्य भूमिकेत असून चित्रपटाची कथा तिच्या पात्रावरचं आधारित असणार आहे. यात ती एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या भूमिकेत दिसेल. सोनाक्षी करणार असलेले अॅक्शन दृश्य ही केरला येथील मार्शल आर्टवर आधारित असणार आहेत. हॉलीवूड अभिनेत्री अॅन्जेलिना जोलीने लारा क्रॉफ्ट या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच सोनाक्षीचीही भूमिका असेल असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
सोनाक्षी घेतेय मार्शल आर्टचे धडे
एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारी सोनाक्षी आता ए आर मुरुगदोसच्या अॅक्शनपटासाठी मार्शल आर्टचे धडे घेत आहे.
First published on: 13-06-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha to learn martial arts for her first ever action role