प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. यामुळे लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोनाली यांचे पती संजय फोगट यांचा २०१६ मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. बिग बॉस कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूबद्दल काही खुलासे केले होते. त्यावेळी त्या प्रचंड भावूक झाल्या होत्या.

सोनाली फोगट ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असायची. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. ती त्यावर नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असायची. तिचा विवाह हरियाणातील हिसार या ठिकाणी राहणाऱ्या संजय फोगट यांच्याशी झाला होता. ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात फार आनंदी होते. मात्र सोनाली यांचे पती संजय फोगट यांचा २०१६ मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह फार्महाऊस आढळून आला होता. जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, त्यावेळी त्या मुंबईत काही कामानिमित्त आल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या पूर्णपणे कोसळल्या होत्या.
Sonali Phogat : टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोनाली या बिग बॉसच्या १४ पर्वात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल खुलासा केला होता. यावेळी त्यांना रडू कोसळले होते. “मी अशा कुटुंबातून आली आहे जिथे महिलांना घराबाहेरही पडण्याची परवानगी नसते. पतीच्या निधनानंतर मला जाणवले की, स्त्रीने एकट्याने आयुष्य जगणे फार कठीण असते. माझ्या पतीच्या निधनानंतर मी घरीच बसावे अशी अनेक लोकांची इच्छा होती. पण मी ते सर्व झुगारुन हा मार्ग निवडला. त्यावेळी लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे. माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करायचे”, असे यांनी यावेळी म्हटले होते.

दरम्यान सोनाली फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. सोनाली यांना एक मुलगी असून यशोधरा असे तिचे नाव आहे. सोनाली यांनी छोट्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. त्या फार प्रसिद्ध होत्या. टिकटॉक स्टार म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे. त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या पर्वात सहभाग घेतला होता. तसेच २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली फोगट यांची प्रसिद्धी पाहून भारतीय जनता पक्षाने हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपाने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती.