अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी २० ऑगस्ट २०२२ रोजी बाळाचा जन्म झाला. सोनम आणि आनंद त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव काय ठेवतील, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मंगळवारी या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. एका मोठ्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सोनमने तिच्या मुलाचं नाव आणि त्याच्यासाठी हे नाव का निवडलं, याचं कारण सांगितलं.

सोनमने प्रसूतीनंतर पहिल्यांदाच तिचा फॅमिली फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सोनम, आनंद आणि त्यांचा मुलगा दिसत आहे. मात्र, मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. या सुंदर अशा फॅमिली फोटोमध्ये सोनम, आनंद व बाळ या तिघांनीही मॅचिंग पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. पिवळ्या रंगाच्या एथनिक आउटफिटमध्ये सोनम सुंदर दिसत आहे, तर आनंदनेही पिवळ्या रंगाचा नक्षीदार कुर्ता परिधान केलाय.

सोनमने स्वतः आणि आनंदने बाळाला धरून ठेवलेला फोटो शेअर केलाय. त्याला कॅप्शन देत तिने लिहिलं, “आमच्या आयुष्यात नवा श्वास जोडला गेला आहे. भगवान हनुमान आणि भीम यांच्या रूपात हा आमच्या सामर्थ्याचे व धैर्याचे प्रतीक आहे. आमचा मुलगा वायु कपूर आहुजासाठी आम्ही सर्वांचे आशीर्वाद मागतो. वायु हा हिंदू धर्मातील पाच तत्वांपैकी एक आहे. वायु स्वतःच एक शक्तिशाली देव आहे. म्हणूनच आम्ही आमच्या मुलाचे नाव वायु ठेवत आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनमच्या बाळाचा जन्म २० ऑगस्ट रोजी झाला होता. त्यानंतर आज बरोबर एका महिन्याने त्याचं नामकरण करण्यात आलं असून बाळाचं नाव वायु ठेवलं आहे.