दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर आणि बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर दिसणार आहेत. नवीन प्रोमोमध्ये अर्जुन आणि सोनम कपूर यांची जोडी प्रेक्षकांना हसवताना दिसत आहे. या एपिसोडमध्ये सोनम कपूरने भाऊ अर्जुनला खूप ट्रोल केलं. दर गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नीप्लस हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये याआधी आमिर खान आणि करीना कपूर यांनी हजेरी लावली होती.

‘कॉफी विथ करण सीझन ७’ मध्ये करण जोहरने सोनम आणि अर्जुन कपूर यांची गमतीशीरपणे ओळख करून दिली. तो म्हणतो, “वेलकम एसएएम…” ज्यावर सोनम कपूर लगेच म्हणते, “हा एम कोण आहे?” हे ऐकून अर्जुन कपूर लाजताना दिसतो. मग तिघंही एम अर्थात मलायका अरोरा असं म्हणताना दिसतात आणि यानंतर सोनम कपूर अर्जुनची खिल्ली उडवायला सुरूवात करते.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
How to remove Bad Smell From Dustbin with the help of five rupees
फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा गायब करेन कचरापेटीतील दुर्गंधी, पाहा VIDEO
a man performed amazing belly dance
Video : ‘तो’ आला, पट्टा बांधला आणि मग जो बेली डान्स केला, लोकांची नजरच हटेना, नेटकरी म्हणे, “मलायका फेल..”
a child girl dance on krishnas bhajan in satsang
VIDEO : चिमुकलीने कृष्णाच्या भजनावर केले नृत्य, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात संस्कार…”

आणखी वाचा- अर्जुन कपूरच्या फोनमध्ये ‘या’ नावाने सेव्ह आहे गर्लफ्रेंड मलायकाचा नंबर

या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर सांगतो, “सोनम कपूर कधीही कोणाची स्तुती करत नाही उलट ती नेहमीच स्वतःच्या कौतुकात मग्न असते. कधी ती तिच्या स्टाइलचं कौतुक करते तर कधी फॅशनचं कौतुक करते. पण ती कधीच आम्हाला शाबासकी देत ​​नाहीत, आमचं कौतुक करत नाही. यावर सोनम कपूर अर्जुनची खिल्ली उडवत लगेच म्हणते, “हो मी असं करते कारण मी अनिल कपूरची मुलगी आहे.”

आणखी वाचा- मलायकाच्या व्हिडीओतील ‘तो’ ठरतोय सर्वांच्या नजरेत हिरो, ‘या’ कृतीचं होतंय कौतुक

‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूर सतत अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावर अर्जुन कपूर “सोनम कपूरकडून ट्रोल होण्यासाठी मला इथे बोलावले आहे का?” असंही म्हणताना दिसतो. दरम्यान या शोमध्ये आतापर्यंत, अक्षय कुमार, समांथा रुथ प्रभू, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रणवीर सिंग, आलिया भट्ट, करीना कपूर खान आणि आमिर खान या सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे.