बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच सोनमने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सोनम भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना अशिक्षित असं म्हटलं आहे.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का, हे विधेयक आहे. अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. त्याचा हा व्हिडीओ सोनमने शेअर केला आणि म्हणाली, ‘अशिक्षित, दुर्लक्ष करणारा आणि द्वेषपूर्ण’, असे कॅप्शन सोनमने शेअर केले आहे. हे पोस्ट शेअर करत सोनमने संताप व्यक्त केला आहे. सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

आणखी वाचा : ‘तुमचा धर्म इतरांवर लादणे बंद करा’, उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनम सगळ्यात शेवटी एके वर्सेस एके या चित्रपटात दिसली होती. त्या आधी सोनम जोया फॅक्टरमध्ये दिसली होती. सोनमने सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर याशिवाय सोनम ‘दिल्ली-6’, ‘खूबसूरत’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे.