सोनम कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे टेलिव्हिजनवरील ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आले आहे. या कार्यक्रमात सोनम कपूरने केलेल्या वक्तव्यांमुळे दीपिका आणि सोनम यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘कॉफी विथ करण’च्या मागील सिझनमध्ये दीपिका आणि सोनम कपूरने या कार्यक्रमाला एकत्रित हजेरी लावली होती. मात्र, ‘कॉफी विथ करण’च्या यावेळच्या सिझनमध्ये करण जोहरच्या प्रश्नांना सोनमने दिलेल्या उत्तरांमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी दीपिका पदुकोण हिला स्वत:ला ‘फॅशन सेन्स’ची विशेष जाण नसल्याचे सोनम कपूरने सांगितले. दीपिका परिधान करत असलेल्या वस्त्रांमुळे ती बॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, या सगळ्याचे श्रेय दीपिकाला नाही तर तिची ड्रेस डिझायनर अनिता श्रॉफ हिला जात असल्याचे सोनम कपूरने ‘कॉफी विथ करण’मध्ये सांगितले.
यावेळी कतरिना कैफ आणि दीपिकाची तुलना करताना ‘ फॅशनचा विचार करायचा झाल्यास कतरिनाला स्वत:ची अशी ओळख आहे. कतरिना स्वत:ला जाणूनबुजून बदलण्याचा प्रयत्न करत नाही आणि तिच्या याच गोष्टीबद्दल मी तिचा आदर करते’ असे सोनमने सांगितले. एखाद्या मासिकाच्या पृष्ठभागावर झळकण्याच्या अट्टाहासापेक्षा कतरिना ज्या साधेपणाने जीन्स टीशर्टमध्ये वावरते ते आपल्याला अधिक आवडत असल्याचे सांगत सोनमने दीपिकाला चांगलाच टोमणा हाणला आहे. तसेच करण जोहरने दीपिकाचे एका शब्दात काय वर्णन करशील असा प्रश्न विचारला असता ‘चांगली मुलगी वाया गेली’ असे उत्तर सोनमने दिले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2014 रोजी प्रकाशित
दीपिकाच्या ‘फॅशन सेन्स’वर सोनम कपूरचे तोंडसूख
सोनम कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे टेलिव्हिजनवरील 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आले आहे.
First published on: 03-04-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor takes a dig at deepika padukones fashion sense