अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की तो फक्त चांगला अभिनेताच नाही तर एक चांगला माणूसदेखील आहे. सोनूने या कठीण काळात अनेक लोकांना मदत केली आहे. सध्या देशभरात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे करोना रुग्णांना त्रास होत आहे. काही जणांचा जीवही गेला आहे. या सगळ्या समस्यांचा विचार करुन सोनू सूदने आता त्यांनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनूने यासाठी टेलिग्राम अॅपवरुन एक नवा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. त्याने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

आपल्या या ट्विटमध्ये तो म्हणतो, “आता संपूर्ण देश एकत्र येईल. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून इंडिया फाईट्स विथ कोविड या मोहिमेत स्वतःला जोडून घ्या”. या मोहिमेच्या माध्यमातून सोनू गरजू लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजन उपलब्ध करुन देणार आहे. त्याचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतंच लस बनवणारी कंपनी सिरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड या लसीची नवी किंमत जाहीर केली. त्यानुसार, राज्य सरकारांना ही लस ४०० रुपयात मिळणार असून खासगी रुग्णालयांना या लसीसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. यावर सोनूने ट्विट केलं होतं. त्यात तो म्हणतो, “प्रत्येक गरजू व्यक्तीला लसीचा डोस मोफत मिळायला हवा. किंमत ठरवून देणं फार गरजेचं आहे. जे कोणी लस खरेदी कऱण्यासाठी सक्षम आहेत त्यांनी पुढे येऊन मदत करायला हवी. व्यवसाय नंतर कधीतरी करुयात”.