करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. देशभरातील शेकडो मजुरांना त्याने रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली. शिवाय गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी त्याने एका स्कॉलरशिपची देखील सोय केली आहे. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. कोलकातामधील काही चाहत्यांनी तर सोनूचं कौतुक करण्यासाठी दुर्गा मातेच्या मुर्तीसोबत सोनूचा पुतळा देखील उभारला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे चाहते इतर देवतांसोबतच त्याची देखील पूजा करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – ‘बेजबाबदार सिद्धार्थमुळे एलिमिनेट झाले’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्री संतापली

अवश्य पाहा – “हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा

कोलकातामधील प्रफुल्ल कन्नन वेलफेयर असोसिएशन ही संस्था दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने एका भव्य दुर्गा पूजेचे आयोजन करते. या वर्षी त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रवासी मजूर’ हा देखावा उभा केला. सोबतच सोनू सूदचा देखील एक भला मोठा पुतळा केला आहे. सोनूला पाहून इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी हा विषय निवडला होता. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे दुर्गा मातेचं दर्शन घेण्यास आलेले भक्त देवतांसोबतच सोनू सूदची देखील भक्तीभावाने पूजा करत आहेत. चाहत्यांचं हे प्रेम पाहून सोनू देखील भावूक झाला. “आजवरचा सर्वात मोठा पुरस्कार” असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood navratri 2020 durga puja 2020 mppg
First published on: 22-10-2020 at 11:55 IST