बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करतोय. सोनू सूद असा अभिनेता आह ज्याने फक्त आपल्या अभिनयानेच नाही तर समाजकार्य करून लोकांच्या मानत विशेष जागा निर्माण केली आहे. त्याचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी पडेल. अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपली एक इच्छा व्यक्त केलीय. त्याने व्यक्त केलेली इच्छा माहिती पडल्यानंतर त्याचे फॅन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सोनू सूदने आपल्या वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करताना म्हणाला, “विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि हॉस्पिटलमध्ये रूग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे. माझ्या देशातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केलंय, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. लोकांच्या मदतीसाठी मी जी मोहिम सुरू केली, ती कोणत्या गाव किंवा राज्यांपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशासाठी आहे. मी मोहिम मला अखंडपणे सुरू करायचीय.”

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपली ही इच्छा व्यक्त केली. यावेळी बोलताना पुढे तो म्हणाला, “भविष्यकाळात मला देशातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे. मला वेगवेगळ्या राज्यातून बरेच कॉल येत असतात. इतकंच नाही तर माझ्या वाढदिवशी सात-आठ जण थेट सायकल आणि बाईकवरून मला भेटायला येत आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत मदत वेळेत पोहोचेल.”

अभिनेता सोनू सूदने या मुलाखतीत बोलताना त्याचा वाढदिवस तो धुमधडाक्यात साजरा का करत नाही, याचं कारण देखील सांगितलं. यावेळी बोलताना सोनू सूद म्हणाला, “जेव्हा मी माझ्या कामांमध्ये व्यस्त राहत होतो, आता मला त्याची लाज वाटतेय, दोन-तीन वर्षापूर्वी मी माझा वाढदिवस विमानात बसून साजरा करत होतो. आता मला माझ्या आई-वडिलांची खूप आठवण येत आहे. ते आता माझ्याजवळ असायला हवे होते. ज्यांनी मला या जगात आणलं आज तेच माझ्यासोबत नाहीत, म्हणून मला माझा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणं आवडत नाही. पण मी आता माझ्या कुटूंबासोबत आहे”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood on my birthday i want 1000 free beds in hospitals more scholarships for students prp
First published on: 30-07-2021 at 12:42 IST