येत्या काळात वेब सीरिजमध्ये अनेक ज्वलंत, बोल्ड आणि नव्या पिढीतील विषय हाताळले जातातं. यातील अनेक विषय हे सध्याच्या काळाचील नातेसंबंधावंर आणि नात्यातील गुंत्यावर आधारित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशाच एका नव्या विषयावर आधिरत एक मराठी वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
पाश्चिमात्य देशांनतर भारतातही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला. नात्याचा असाच एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे ‘पॉलीअमॉरी’. या नव्या विषयावर आधारित लवकरच ‘सोप्पं नसतं काही’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेव सीरिजमध्ये अभिनेत्री वेबसिरीजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत झळकणार असून नुकताच या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
‘सोप्पं नसतं काही’ या वेब सीरिज ट्रेलर पाहूनच अनेक जण कोड्यात पडले असतील. नेमकी ही कथा लव्ह ट्रॅगल आहे. की विवाहबाह्य संबंधावर आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
View this post on Instagram
तर या वेब सीरिजची कथा ही ‘पॉलीअमॉरी’ या नव्य संकल्पनेवर आधारित आहे. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु ‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय असला तरी भारतीयांसाठी हा प्रकार काही नवीन नाही. भारतीय पुराणात अशा नात्यांची काही उदाहरणं आहेत.मयुरेश जोशी दिग्दर्शित ‘सोप्पं नसतं काही’ ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच ‘सोप्पं नसतं काही’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील.