‘बाहुबली’ चित्रपटामुळे संपूर्ण जगात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. या चित्रपटात अनुष्का आणि प्रभास मुख्य भूमिकेत होते. चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभासच्या अफेरच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चांना पूर्णविराम लागतोच नाही तर अनुष्का एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण नुकताच एका मुलाखतीमध्ये तिने अफेरच्या चर्चांवर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का उत्तर भारतातीय क्रिकेटपटूला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे तिच्या लग्नाचीही जोरदार तयारी सुरु असल्याचे म्हटले जात होते. तसेच हा क्रिकेटपटू कोण आहे याबाबत बरेच तर्कवितर्क चाहत्यांद्वारे लावले जात होते. आता खुद्द अनुष्काने यावर वक्तव्य केले आहे.

‘तामिळ मुरासू’ने दिलेल्या वृत्तानुसार अनुष्का क्रिकेटपटूच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व अफवा असल्याचे अनुष्काने स्पष्ट केले. तसेच तिने तिच्या लग्नाची जबाबदारी पालकांवर सोपावली असल्याचे देखील म्हटले आहे.