कलाकारांचं खासगी आयुष्य कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. कलाकार मंडळी आपल्या नात्याबाबत किंवा कुटुंबाबत बोलणं टाळत असले तरी त्याबाबत रोज नव्या चर्चा रंगतात. आता असाच एक सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता बबलू पृथ्वीराजने वय वर्ष २३ असलेल्या मुलीशी लग्न केलं असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा – Video : “हिला वेड लागलंय का?” अंगभर लायटिंग करून रस्त्यावर फिरतेय राखी सावंत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

‘आज तक’च्या वृत्तानुसार ५६ वर्षीय बबलूने दुसरं लग्न केलं आहे. त्याची पहिली पत्नीही आहे. शिवाय आता ज्या मुलीशी त्याने लग्न केलं ती मुलगी त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान आहे. बबलूच्या पहिल्या पत्नीचं नाव बीना आहे. १९९४मध्ये बबलूने बीनाशी लग्न केलं. बबलू-बीनाला २७ वर्षाचा मुलगाही आहे.

मुलगा सतत आजारी असल्यामुळे बबलू-बीनाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. तसेच मुलाच्या आजारपणामध्ये दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. काही वर्षांपासूनच दोघांमध्ये वाद सुरु असल्याचं बोललं जातं. पण बबलूने खरंच दुसरं लग्न केलं आहे का? याबाबत त्याने कोणतंही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही. पण लवकरच पहिल्या पत्नीपासून तो विभक्त होणार असल्याचीही चर्चा आहे.

आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तमिळ चित्रपटांमध्ये बबलूने आजवर उत्तम काम केलं आहे. नकारात्मक भूमिकांमुळे तो बराच चर्चेत आला. छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिकांमध्येही त्याने काम केलं. १०० पेक्षा अधिक दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये त्याने आजवर भूमिका साकारल्या. त्याच्या फिटनेसमुळे तर तो कायम चर्चेत असतो. पण त्याने खरंच दुसरं लग्न केलं का? याबाबत अजूनही बबलूने न बोलणंच पसंत केलं आहे.