‘विक्रम’नंतर कमल हासन पुन्हा एकदा ऍक्शन अवतारात : दिसणार ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये

खूप वर्षांनी या चित्रपटात प्रेक्षकांना कमल हासन हे ऍक्शन मोडमध्ये दिसले आणि प्रेक्षकांनीही खूप कौतुक केलं.

‘विक्रम’नंतर कमल हासन पुन्हा एकदा ऍक्शन अवतारात : दिसणार ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये
कमल हासन विक्रम | kamal haasan

नुकत्याच आलेल्या ‘विक्रम’ या चित्रपटातून दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. दाक्षिणात्य चित्रपट असूनही सगळ्याच राज्यात लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. कमल हासन यांच्याबरोबर विजय सेतूपती आणि फहाद फाझीलसारखे मातब्बर कलाकारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते. खूप वर्षांनी या चित्रपटात प्रेक्षकांना कमल हासन हे ऍक्शन मोडमध्ये दिसले आणि प्रेक्षकांनीही खूप कौतुक केलं. आता कमल हासन पुन्हा एकदा अशाच डॅशिंग भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे.

साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांच्याबरोबर १९९६ साली कमल हासन यांनी ‘इंडियन’ हा चित्रपट केला होता. आता याच चित्रपटाच्या सीक्वलच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १९९६ साली या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता म्हणूनच इतक्या वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

आणखीन वाचा : नव्या चित्रपट धोरणावर अभिनेते कमल हासन संतापले; ट्वीट करत म्हणाले…

२०१७ मध्येच खरंतर या चित्रपटावर काम सुरू झालं होतं. पण चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या काही लोकांचं अकस्मात निधन झाल्याने याच काम रखडलं होतं. आता या चित्रपटावर पुन्हा काम सुरू झालं असून २४ ऑगस्टपासून याच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असं म्हंटलं जात आहे.

एका मीडिया पोर्टलशी संवाद साधताना खुद्द कमल हासन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात “काही अकस्माक घटना आणि कोरोना महामारी यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीत बरीच विघ्न आली, पण माझ्यावर आणि दिग्दर्शक शंकर यांच्यावरही बऱ्याच जवाबदाऱ्या आहेत, त्यामुळे आम्ही इतर कामं हाती घेतली. एका चित्रपटासाठी एवढा वेळ देण्याचा जमाना आता नाही, :मुघल-ए-आजम’सारखं तुम्ही आता एकाच चित्रपटासाठी एवढा वेळ खर्ची करू शकत नाहीत.”

दिग्दर्शक शंकर हे इंडियन २ बरोबरच रणवीर सिंगच्या ‘अपरिचित’च्या रिमेकच्या कामात व्यस्त आहे. कमल हासन आणि शंकर यांची जोडी पुन्हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dahi Handi 2022 : ठाण्यात एकनाथ शिंदे आणि श्रद्धा कपूर एकाच मंचावर, अभिनेत्री म्हणाली, “मुख्यमंत्री आपल्याबरोबर आहेत यापेक्षा…”
फोटो गॅलरी