चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा सातत्याने पाहायला मिळत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत आता बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रादेशिक चित्रपट अग्रस्थानी असल्याचं समोर येत आहे. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपट याचं उत्तर उदाहरण आहे. ‘बाहुबली’नंतर आता आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाने विश्वविक्रम केला आहे. जगभरात सर्वाधिक ‘लाईक्स’ मिळवणाऱ्या चित्रपटांच्या टीझरच्या यादीत या चित्रपटाचा टीझर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या आगामी ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाच्या टीझरने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ६ लाख ४० हजार लाईक्स मिळवत ‘भारत अने नेनू’चा टीझर जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला दुसरा टीझर ठरला आहे.

कोरटला शिवा दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाची पार्श्वभूमी राजकारणाशी संबंधित आहे. यामध्ये महेश बाबूसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. ‘एम.एस.धोनी’ या चित्रपटातून कियाराने बॉ़लिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर महेश बाबूचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चाहते आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar mahesh babu upcoming movie bharat ane nenu teaser worldwide broke record
First published on: 29-03-2018 at 09:03 IST