दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय सध्या चांगलाच चर्चेत आहे. थलपथी विजय आणि त्याची पत्नी संगीता घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोघांचा २३ वर्षांच्या सुखी संसारात अचानक वादळ आल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

विजयच्या विकिपीडीया पेजवरील माहितीवरुन त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अटली कुमारच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभातही फक्त थलपती विजयने हजेरी लावली होती. विजयची पत्नी संगीता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हती. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना पेव फुटलं होतं. आता मात्र याबद्दल एक वेगळीच माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा : भगव्या बिकिनीमध्ये मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज; चाहत्यांनी काढली ‘भिगे होंट तेरे’ची आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुपरस्टार विजयच्या एका निकटवर्तीयाने ही गोष्ट खोडून काढली. या दोघांचा घटस्फोट होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विजय आणि संगीताच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने या गोष्टीची पुष्टी केली आहे. २२ वर्षांपासून या दोघांचा सुखी संसार सुरू आहे आणि या सगळ्या बातम्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे.

१९९६ मध्ये थलपथी विजय व संगीता पहिल्यांदा एकमेकांना भेटले. संगीता विजयची चाहती होती. त्याला भेटण्यासाठी ती लंडनहून चेन्नईला आली होती. त्यानंतर विजय व संगीतामध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढले. २५ ऑगस्ट १९९९ रोजी थलपथी विजय व संगीताने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांना जेसन हा मुलगा व दिव्या ही मुलगी आहे.