‘स्पायडरमॅन’ हा चित्रपट संपूर्ण जगात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता जेम्स फ्रेंको पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फ्रेंको विरोधात ४ वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आता यावर वक्तव्य केलं आहे. यावेळी त्याने सांगितले की त्याला सेक्सचे व्यसन लागले होते. त्याने त्याच्याच अॅक्टिंग स्कुलमधील विद्यार्थांसोबत लैंगिक संबंध ठेवले होते. परंतू गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत:मध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेम्सने एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. “मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवले आणि ती चुकीची गोष्ट आहे.” पुढे जेम्स म्हणाला, ‘त्याला सेक्सचे व्यसन असल्यामुळे त्याने अॅक्टिंग स्कुल सुरु केले नव्हते. त्यावेळी माझे विचार असे होते की जर ते सहमत असतील तर ठीक आहे. त्यावेळी मला स्पष्ट काही कळत नव्हते.”

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

जेम्स विरोधात ४ वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्याने यावर वक्तव्य केले आहे. ‘लॉस एंजलिस टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ५ महिलांनी जेम्सवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये दोन महिलांनी जेम्स विरोधात तक्रार दाखल केली होती. जेम्सवर अॅक्टिंग स्कूलमध्ये कलाकार होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे आणि तरुण महिलांकडून सेक्स सीनचे शूटिंग करण्याचे आरोप करण्यात आले होते.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

जेम्स म्हणाला, “तरुण असतानाच त्याला मद्यपानाची वाईट सवय लागली होती. त्यानंतर त्याला सेक्सचे व्यसन लागले होते.” यावर पुढे तो म्हणाला, “हे खूप पॉवरफूल ड्रग आहे. २०१६ मध्ये त्याच्या विरोधात आरोप केल्यानंतर जेम्सने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असून स्वत:मध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करत आहे. मला लोकांना दुखवायचे नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spider man fame james franco breaks silence on sexual misconduct allegations admits sleeping with students dcp
First published on: 23-12-2021 at 12:18 IST