श्रीदेवीने घेतलेल्या अचानक एक्झिटमुळे तिच्या कुटुंबियांबरोबरच बॉलिवूडकरांना आणि रसिकांना चांगलाच धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरणे बॉलिवूडकरांना आणि तमाम चित्रपटप्रेमींना कठिण झाले आहे. त्यातच होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना कलाकारांनी होळी सेलिब्रेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपण दरवर्षीप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होळीचे सेलिब्रेशन म्हणजे बॉलिवूडकरांसाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण असतो. पण श्रीदेवीच्या एक्झिटमुळे आपण ही पार्टी रद्द केल्याचे शबाना आझमी यांनी ट्विट करत सांगितले. २ मार्च रोजी होणारा हा कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये होळीचे सेलिब्रेशन न होण्याचीच शक्यता जास्त आहे. श्रीदेवी हिचा शनिवारी रात्री दुबईमध्ये पुतण्याच्या लग्नासाठी गेलेली असताना मृत्यू झाला. हा मृत्यू हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे नुकत्याच हाती आलेल्या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. श्रीदेवी यांनी मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेला आणि त्या बाथटबमध्ये पडल्या. बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव शवपेटीत ठेवण्याच्या प्रक्रीयेसाठी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sridevi death holi party cancelled by shabana azmi tweet
First published on: 26-02-2018 at 21:15 IST