बॉलिवूड दंबंग सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील दुरावा सर्वज्ञात आहे. २००१ साली सलमान खानपासून दुरावल्यानंतर ऐश्वर्याची विवेक ओबेरॉयशी जवळीक निर्माण झाली होती. या कारणावरुन विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात चांलाच वाद झाला होता. त्यानंतर दोघांच्यातील अबोला अद्यापही कायम आहे. दोघे समोरा समोर आले की बॉलिवूड जगतामध्ये आजही चर्चेला उधाण येत असते. नुकतेच शाहरुख खानच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये हे दोन कलाकार एकत्र आले होते. सलमान पार्टीत असल्यामुळे विवेक ओबेरॉय पार्टीचा म्हणावा तसा खुलून वावरत नव्हता अशी माहिती सूत्रांकडून समजते. या पार्टीमध्ये विवेक ओबेरॉय सलमान खानकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करताना दिसला. सलमान ज्या दिशेला असेल त्याच्या विरुद्ध दिशेला विवेक भटकताना दिसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


दरम्यान कार्यक्रमामध्ये सलमान खान कतरिना कैफ, शाहरुख खान आणि ह्रतिक रोशन यांच्यासोबत पार्टी एन्जॉय करत होता. यावेळी सलमानने विवेककेड पाहण्याचेही कष्ट घेतले नाहीत. ऐश्वर्यामुळे विवेक आणि सलमान खान यांच्यात झालेल्या वादानंतर अनेकदा हे दोघे समोरा समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खानने आपल्या होम प्रॉडक्शन ‘हिरो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच हॉटेलमध्ये विवेक आपल्या खासगी कामानिमित्त आल्याचे वृत्त पसरले होते. दोघे एका छताखाली आल्याचे समजल्यानंतर प्रसारमाध्यमांनी दिल्लीतील हॉटेल बाहेर गर्दी केली होती. मात्र सलमान खानच्या टीमने यावेळी सलमान-विवेक समोरासमोर आले नसल्याचे स्पष्ट केले होते.


बॉलिवूडमधील विवेक आणि सलमान हे कलाकार जेंव्हा जेंव्हा एकत्र येतात तेव्हा दोघांच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण येत असते. रितेशच्या या आगामी मराठी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजात दिसणार आहे अशा चर्चांना उधाण आले होते.रितेशच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी’ या मराठी चित्रपटात भाईजान सलमान खान देखील काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नाही तर सलमानची या चित्रपटातील भूमिका देखील महत्त्वाची असल्याची सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विवेक ओबेरॉय आणि सलमान खानचा आमना-सामना लवकरच होऊ शकतो. सलमान-विवेक यांच्यातील वादाप्रकरणी विवेकने सलमानची अनेकदा माफी मागण्याचा देखील प्रयत्न केला होता पण, त्याचा काही फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srks party salman and vivek crossed paths
First published on: 02-12-2016 at 16:37 IST