एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाचं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे. वेगवेगळ्या देशात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि तिथे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जपान आणि अमेरिकेत तर या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून मान मिळवलाच आहे. आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एक वेगळाच आणि अभूतपूर्व असा इतिहास रचला आहे.

लॉस एंजेलीसच्या ‘चायनीज थिएटर’मध्ये केवळ ९८ सेकंदात ‘आरआरआर’चा शो हाऊसफुल्ल झाला आहे. हा प्रकार याआधी कधीही झाला नसल्याचं इथल्या आयोजकांचं म्हणणं आहे. लॉस एंजेलीसमधील चायनीज थिएटर आयमॅक्समध्ये ‘आरआरआर’ ९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याची तिकीटविक्री आजच सुरू करण्यात आली होती. अवघ्या ९८ सेकंदात तब्बल ९३२ तिकीटं विकली गेल्याचा दावा इथल्या आयोजकांनी केला आहे.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : “स्त्रीकडे केवळ एक वस्तू म्हणून…” हिजाबवरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर.रेहमानच्या मुलीने दिलेलं चोख उत्तर

हा एक नवा विश्वविक्रम या चित्रपटाच्या नावावर झाला आहे. अमेरिकेत हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. व्हराईटी मॅगझिनच्या संभाव्य ऑस्कर विजेत्यांच्या यादीत आरआरआरला मानाचं स्थान मिळालं आहे. गेल्यावर्षी ऑस्करवारी हुकली असली तरी यावर्षी या चित्रपटाला ऑस्करच्या यादीत स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा – ‘RRR’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्यासाठी पुरस्कार मिळाला, पण…

या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक यांचाही जगभरात सन्मान केला जात आहे. हा चित्रपट कोमराम भीम आणि अल्लूरी सीताराम राजू या क्रांतिकारकांच्या आयुष्यावर आणि मैत्रीवर बेतलेला आहे. राजामौली यांनी नुकतंच या चित्रपटाचा पुढील भागसुद्धा येऊ शकतो अशी पुसटशी कल्पनादेखील देऊन ठेवली आहे.