गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वत्र लागले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने आणि आसमंत दरवळून टाकणाऱ्या पुजाविधीच्या सामग्रीने बाजारपेठा सजल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोट्या पडद्यावरदेखील गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. लाडक्या गणरायाचं स्वागत स्टार प्रवाहचे कलाकार अगदी जल्लोषात करणार आहेत. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ या गणपती विशेष कार्यक्रमात बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे.

सणासुदीचे दिवस म्हण्टले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. १२ सप्टेबंरला संध्याकाळी ७ वाजता वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येणार आहे. या खास कार्यक्रमात प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांना एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना भेटता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah ganpati special episode dance and pooja kpw
First published on: 01-09-2021 at 15:56 IST