स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत लवकरच डॉक्टर वैभवीला स्वराजच्या पत्नीची हत्या झाल्याचं लक्षात येणार आहे. या भागाचा प्रोमो सध्या वाहिनी वर प्रसारित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये जेव्हा मृत वैभवी ही डॉक्टर वैभवीला स्पर्श करते तेव्हा तिला स्वराजच्या पत्नीचा इमारतीवरून कसा मृत्यू झाला याचं दृशय दिसतं.

या प्रोमोत स्वराजची पत्नी वैभवी इमारतीवरून अनेक फूट खाली स्वराजच्या गाडीवर कोसळताना दिसतेय. मालिकेच्या या सीनसाठी मालिकेच्या टीमने मोठी मेहनत घेतली आहे. एवढचं नव्हे तर या स्टंटसाठी वैभवीने म्हणजेच अभिनेत्री सानिया चौधरीने मोठं धाडस दाखवत हा स्टंट स्वत: पूर्ण केला आहे. सानियाने या सीनच्या मेकिंगचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात सानिया सुरुवातीला प्रचंड घाबरल्याचं दिसत आहे. सानियाला एका क्रेनला बांधण्यात आलं आहे. क्रेनच्या मदतीने सानिया जशी जशी वर जाऊ लागली तशी तिची चांगलीच घाबरगुंडी उडाली. नंतर मात्र मोठं धाडसं दाखवत तिने हा सीन पूर्ण केला.

पहा फोटो: रिंकू राजगुरुच्या फोटोवर शाहीद कपूरच्या भावाची कमेंट, नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

या सीनसाठी संपूर्ण टीमनेच मोठी मेहनत घेतल्याचं दिसतंय. या सीनमध्ये वैभवी स्वराजच्या गाडीवर पडतानाचं दृष्य चित्रित करायचं होत. यासाठी वैभवीचा चेहरा दिसणं आवश्यक असल्याने कोणताही स्टंटमॅन न वापरता हे दृश्य चित्रित करण्यात आलंय. या सीन यशस्वीपणे शूट झाल्यानंतर सर्वानीच सानियाचं कौतुक केलं. अभिनेत्री सिनिया चौधरीने तिच्या या स्टंट सीनचा अभुवन शेअर केलाय.

पहा फोटो: संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका!

‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या येत्या भागात हा थरार पाहायला मिळणार आहे. तसंच आता वैभवीचं कारण मृत्यूमागे आत्महत्या की हत्या हे स्वराजला कळणार का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.