स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. यात कानिटकर आणि वर्तक कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अपूर्वा वर्तक आणि शशांक कानिटकर ही जोडी प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. नुकतंच या मालिकेत बाबी आत्याच्या लग्नसोहळा पार पडल्याचे पाहायला मिळाला. या मालिकेत बाबी आत्या हे पात्र अभिनेत्री सारिका नवाथे साकारताना दिसत आहे.
सारिका नवाथे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच सारिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा मुलगा रेयांशसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. तिचे हे सर्व फोटो ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या सेटवरचे आहेत. यासोबत तिने त्याला फार सुंदर असे कॅप्शनही दिले आहे.
सारिका नवाथेची इन्स्टाग्राम पोस्ट
“Reyansh माझा लहाना मुलगा आणि माझी आई काल सेट वर आले.
रोज आई शुट ला जाते पण exactly तिथे काय करते हे पाहण्याची उत्सुकता त्याला नेहमीच असते .. काल मी सीन करत असताना माझे सीन शूट करत होता मोबाईलवर .. मी किती वेळा चुकतेय ते काऊंट करून मला सांगत होता . मी सीन छान केला असा खुणे ने दाखवत होता ..
थोड्यावेळानी घरी परत जातोयेस का ?असा विचारल्यावर तडक नाही असा उत्तर दिला …प्रत्येक आई नि जमलं तर आपल्या मुलांना वर्कप्लेसला न्यावं , त्यांना पाहू द्यावा आई घराबाहेर काय करते , कसं बोलते , कसं वागते ,कसं वातावरण असता ? हार्डवर्क म्हणजे काय असता ? सगळं च्या सगळं त्यांना कळणार नाही कदाचित पण थोडा अंदाज मात्र नक्कीच येईल ?
मी काम करत असताना माझ्या मुलाला आजूबाजूला पाहणे ही एक सुंदर भावना होती… त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहायला मिळाली.
रेयांशला इतके प्रेम दिल्याबद्दल माझ्या ठिपक्यांची रांगोळीच्या संपूर्ण टीमचे आभार…”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सारिका नवाथे हिची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत असल्याचे पाहायला मिळात आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.