इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात निर्माता गुनीत मोंगा आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ चित्रपटाची अभिनेत्री रवीना टंडनही उपस्थित होते. या कॉमेडी शोमध्ये सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या आणि नारायण मूर्ती यांच्या पहिल्या भेटीबाबात सुधा मूर्ती यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. लग्नानंतरही नारायण मूर्तींचे वजन का वाढले नाही याबाबत सुधा मूर्तींनी खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘जवान’ आणि ‘डंकी’नंतर शाहरुखचा ‘डॉन-३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला? निर्माते रितेश सिधवानी यांनी केला खुलासा, म्हणाले…

नारायण मूर्तींबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगत सुधा मूर्ती म्हणाल्या, नारायण मूर्तींचे एक मित्र होते, त्यांचे नाव प्रसन्न होते आणि ते माझेही सहकारी होते. ‘आम्ही बसने कामावर जायचो आणि ते रोज एक पुस्तक घेऊन यायचे. प्रत्येक पुस्तकावर नारायण मूर्ती इस्तंबूल, नारायण मूर्ती पेशावर, नारायण मूर्ती पॅरिस असे लिहिले होते. मला वाटले नारायण मूर्ती इंटरनॅशनल बस कंडक्टर आहेत का? मी विचारले की, हे नारायण मूर्ती कोण आहेत? ते म्हणाले की, तो माझा मित्र आहे जो पॅरिसमध्ये होता आणि आता भारतात आला आहे आणि त्याला एकदा भेटायचे आहे.

हेही वाचा- “मी तुमच्याशी सहमत…”; ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना अदा शर्माचे चोख उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायण मूर्ती एखाद्या फिल्मी हिरोसारखे, देखणे, बोल्ड आणि डॅशिंग असतील असे मला वाटले होते. पण जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा म्हटले, हा माणूस कोण आहे? हा तर एकदम लहान मुलासारखा दिसतो. नारायण मूर्तींच्या वजनाबाबतही सुधा मूर्तींनी खुलासा केला आहे. ‘लग्नाच्या वेळी नारायण मूर्तींचे जेवढे वजन होते, लग्नानंतरही ते तेवढेच कायम आहे. कारण मी एक वाईट स्वयंपाकी आहे आणि म्हणूनच माझ्या नवऱ्याने आजपर्यंत आपले वजन कायम राखले आहे,’ असे विनोदी उत्तर सुधा मूर्तींनी दिले आहे.