स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद धनू हे सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावली. त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि यानंतर काही वेळाने त्यांचे निधन झाले.

अरविंद धनू यांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक चित्रपटातही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. ‘लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत ते झळकले होते. त्यासोबतच ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ही त्यांची मालिका लोकप्रिय ठरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेत त्यांनी शालिनीचे वडील ही भूमिका साकारली होती. यासोबत त्यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटातही काम केले. ते आघाडीचे असे अभिनेते होते.