गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेला ‘सुलतान’ चित्रपट आज ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अनुष्का शर्मा कुस्तीपटुंच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच सुलतानची प्रचंड चर्चा रंगली होती. हा चित्रपट पहिल्याच वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा व्यवसाय करेल, असा अंदाज चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. आजपर्यंत ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्याचा इतिहास आहे. आता हे अंदाज कितपत खरे ठरणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2016 रोजी प्रकाशित
सुलतान रिव्ह्यू : ईदनिमित्त सलमानकडून चाहत्यांसाठी ‘सुलतान’ मुबारक!
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्याचा इतिहास आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-07-2016 at 17:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sultan review salman khan anushka sharma deliver solid performances