बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आणि मुलगी अथिया शेट्टी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अथिया भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तर अहान शेट्टीने गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.
नुकताच सुनीलने ईटाइम्सशी संवाद साधताना मुलांच्या लव्ह लाइफबद्दल चर्चा केली आहे. ‘माझे माझ्या मुलांवर प्रचंड प्रेम आहे. माझ्या मते, व्यावसायिक जीवनापेक्षा खासगी आयुष्यात आनंदी असणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण आपण तिच गोष्ट सर्वात जास्त मिस करतो. आम्ही सर्वजण सध्या आमच्या आयुष्यात आनंदी आहोत’ असे सुनील म्हणाला.
‘तुम्ही तुमचे आयुष्य पाहिले किंवा आमचे पाहिले तर आपण सर्वच आनंदी असल्याचे दिसेल. पण आजकालच्या पिढीला मी लोकांना आवडते का?, माझे कपडे बरोबर आहेत ना?, माझ्याकडे छोटा फोन तर नाही ना? असे अनेक चिंताग्रस्त प्रश्न त्यांच्या मनात घर करुन असतात. हे प्रश्न आम्हाला कधीच पडले नाही. पण आता वेळ बदलला आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे’ असे सुनील पुढे म्हणाला.
आणखी वाचा : अभिनेत्रींनी स्वीमसूटमध्ये दिली ‘नागिन ५’साठी ऑडिशन; व्हिडीओ व्हायरल
सुनील त्याच्या मुलांच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना म्हणला की ‘मला अहानची गर्लफ्रेंड आवडते आणि अथिया ज्या कोणासोबत रिलेशनमध्ये असेल तो देखील मला आवडेल. मला त्यांच्या रिलेशनमुळे कोणतीच अडचण नाही. माझ्या मुलांचे भाग्य आहे की ते इतक्या चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आले’