पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये जम बसवलेली अभिनेत्री सनी लिओनी आणि बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ अशी ओळख असलेले अभिनेते आलोकनाथ यांची भूमिका असलेला धुम्रपानाविरोधात जनजागृती करणारा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. युट्यूबवर या व्हिडिओला नेटिझन्सची चांगली पसंती मिळत असून, या व्हिडिओतून धुम्रपानाचे दुष्परिणाम प्रभावीपणे दाखविण्यात आले आहेत. आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱया सनी लिओनीने या व्हिडिओतून आपल्या हटके स्टाईलने व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. ’11 minutes’ असे या व्हिडिओचे नाव आहे.
सनी आणि आलोकनाथ यांच्यासह अभिनेता दीपक डोब्रियाल देखील या व्हिडिओमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येतो. सिगारेटचे व्यसन असलेला मुलगा (दीपक डोब्रियाल) तरुण वयातच आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजताना दाखविण्यात आला आहे. त्याचे वडील (अलोकनाथ) जेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारतात तेव्हा तो सनी लिओनीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त करतो. मग त्याचे सनीसोबत लग्न देखील लावून दिले जाते. सनी घरी सून म्हणून आल्यानंतर काय होते हाच या व्हिडिओचा खरा क्लायमॅक्स आहे. पाहा-
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: धुम्रपानामुळे..अशा महत्त्वाच्या क्षणांना मुकाल, सनी लिओनीचा ‘संस्कारी बाबूजींसोबत’चा व्हिडिओ हिट
पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये जम बसवलेली अभिनेत्री सनी लिओनी आणि बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ अशी ओळख असलेले अभिनेते आलोकनाथ यांची भूमिका असलेला धुम्रपानाविरोधात जनजागृती करणारा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. युट्यूबवर या व्हिडिओला नेटिझन्सची चांगली पसंती मिळत असून, या व्हिडिओतून धुम्रपानाचे दुष्परिणाम प्रभावीपणे दाखविण्यात आले आहेत. आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱया सनी लिओनीने या व्हिडिओतून आपल्या […]
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 24-02-2016 at 14:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone alok nath and deepak dobriyal no smoking campaign