बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी ही सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सनीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत चर्चेत असतात. आता सनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिचा आगामी चित्रपट ‘अनामिका’ या चित्रपटातील सेटवरचा आहे. या व्हिडीओमध्ये सनीच्या हातात भांडी आहेत आणि ती डान्स करताना दिसत आहे. “मस्ती ऑन सेट” अशा आशयाचं कॅप्शन सनीने त्या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : विराट नाही तर हा आहे अनुष्काचा ‘सिरिअल चिलर’ मित्र
काही दिवसांपूर्वी सनीने अनामिका या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.