पॉर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये एण्ट्री घेतलेली अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी ‘कुछ कुछ लोचा है’ चित्रपटातील ‘दारु पीके डान्स’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
याच चित्रपटातील पानी वाला डान्स या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील या दुसऱया गाण्याला देखील चाहत्यांची चांगली पसंती मिळेल असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांना आहे. अमजद नदीम यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे गायिका नेहा काकर आणि ऐश्वर्या निगम यांनी गायले आहे. या गाण्यात सनी लिओनी देसी अवतारात दिसणार असून आपल्या मादक अदांनी घायाळ करताना दिसेल. गाण्यात सनी सोबत अभिनेता राम कपूर, नवदीप छाब्रा आणि अभिनेत्री एवलीन शर्मा देखील थिरकताना दिसतात.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2015 रोजी प्रकाशित
सनी लिओनीचा ‘दारू पीके डान्स’
पॉर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये एण्ट्री घेतलेली अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी 'कुछ कुछ लोचा है' चित्रपटातील 'दारु पीके डान्स' हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
First published on: 16-04-2015 at 04:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone daru pike dance song from movie kuch kuch locha hai