आपल्या नावापुढील पॉर्नस्टार रुपकाचे परिवर्तन एका उत्तम अभिनेत्रीच्या रुपात होण्याची इच्छा बाळगणारी सनी लिओनी लवकरच आणखी एका बॉलीवूड चित्रपटासाठी चित्रीकरण सुरू करणार आहे.
प्रिटीश नंदी यांच्या सेक्सी-कॉमेडी ‘मस्तीजादे’ चित्रपटासाठी सनी लिओनीसोबत लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे ट्विट रंगिता नंदी हिने केले आहे. ‘प्रिटीश नंदी कॉम’ या ट्विटर अकाऊंटवरूनही याची पुष्टी करण्यात आली आहे.


नुकतेच एका हिरे व्यापाऱयाच्या पार्टीत सनीने स्ट्रिप डान्स केल्याची चर्चा आहे. मात्र असा कोणताही नाच आपण केला नसल्याचा दावा सनीने केला आहे. त्याबाबतच्या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचे सनी लिओनीचे म्हटले होते. सनी सध्या ‘टीना अँड लोलो’ या अॅक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
आपली पॉनस्टार म्हणून असलेली ओळख पुसून टाकून उत्तम अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचे सनीने एका मुलाखतीत म्हटले होते. तसेच आपल्या ‘बोल्ड’ चित्रपटांपेक्षा अभिनय केंद्रीत चित्रपटांवर भर देण्याचीही इच्छा सनीने व्यक्त केली होती.
सनी लिओनीने याआधी बॉलीवूडमध्ये जीस्म-२, जॅकपॉट आणि रागिनी एमएमएस-२ मध्ये काम केले आहे. तसेच आगामी काळात सनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही दिसणार आहे.