आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असलेली सनी लिओनी वेगवेगळ्या कारणांमुळे कायमचं चर्चेत असते. परदेशात वाढलेल्या सनीने भारतात बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. जबरदस्त डान्सने तिने चाहत्यांची मनं जिंकली.
बॉलिवूडच्या बेबी डॉलने नुकतंच बॉलिवूड आणि भारताबद्दल तिच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सनी तिच्या पती आणि मुलांसोबत मुंबईत राहते. कधी कधी ती तिच्या अमेरिकेतील लॉस एँजेलीस इथल्या घरी कुटुंबासोबत जात असते.
परदेशात बराच काळ राहून तिथं घर असूनही सनीला भारतात राहणं आवडतं असल्याचं तिने म्हंटलं आहे. ‘इंडिया टूडे’ ला दिलेल्या एका मुलाखतीत सनीने तिला अमेरिकेपेक्षा भारतात राहणं जास्त आवडतं असल्याचं स्पष्ट केलंय. कुठे राहणं जास्त पसंत आहे या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाल, “भारतात राहणं मला जास्त पसंत आहे. मला अमेरिकेत राहण्याची इच्छा नाही तिथे मला नकारात्मक वातावरण असल्याचं जाणवतं. भारतात एकदम मस्त वातावरण आहे. इथे प्रेमळ लोकं आहेत, मजा आहे. प्रत्येक देशातच्या काहीना काही समस्या असतात पण पाहायला गेलं तर भारत एक सुंदर देश आहे.” असं ती म्हणाली. सनीच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर तिचं चांगलचं कौतुक होतंय.
सनीला तिच्या मुलांसोबत अनेकदा मुंबईमध्ये स्पॉट केलं जातं. तसचं मुलांसोबत वेळ घालवतानाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावरदेखील शेअर करत असते.
सनी लिओनीने ‘जिस्म-2’ या सिनेमातूनन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर अनेक सिनेमांमधून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. सनी लिओनी लवकरच ‘अनामिका’ या सीरिजमध्ये झळकणार आहे. त्याचसोबत हॉरर कॉमेडी सिनेमा ‘कोला कोला’ आणि ‘रंगीला’ मध्येदेखील तिचा हटके अंदाज पाहायला मिळेल.