हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी आहे. १९७८ साली रिलीज झालेल्या ‘सुपरमॅन’चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर रिचर्ड डोनर यांचं निधन झालंय. ‘सुपरमॅन’सोबत त्यांनी ‘द गोनीज’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. काल ५ जुलै रोजी त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी आणि फिल्म निर्मात्या लॉरेन शूलर डोनर यांनी ही माहिती दिलीय. पण त्यांचं निधन कशामुळे झालंय, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांच्या निधनाची बातमी पसरताच हॉलिवूडमध्ये शोककळा परसलीय. तसंच अनेक सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

१९७६ साली रिलीज झालेल्या ‘द ओमेन’मधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९७८ साली रिलीज झालेल्या ‘सुपरमॅन’ चित्रपटाला दिग्दर्शित करण्यासाठी त्यांनी १ मिलियन डॉलर इतकी रक्कम घेतली होती. रिचर्ड डोनर हे चित्रपट बनवताना त्यातील पात्रांमध्ये आपला जीव ओतून देत असत. सुपरहिरो उडू शकतो हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स देण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या चित्रपटातील सुपरमॅनच्या भूमिकेसाठी त्यांनी क्रिस्टोफर रीव यांची निवड केली होती. ते आजही प्रेक्षकांच्या मनात सुपरमॅन बनून राहिले आहेत. त्यांची ही शैली आजच्या २१ व्या शतकाच्या काळात अनेक दिग्दर्शक वापरताना दिसून येतात.

दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांच्या निधनाची बातमी कळताच हॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजरी अर्पण केली. ‘द गोनीद’चे प्रोड्यूसर स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी देखील एक पोस्ट शेअर करत रिचर्ड डोनर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच याच चित्रपटातील कलाकार सीन अस्लीन, दिग्दर्शक केविन स्मिथ, फिल्ममेकर ईद्गर व्रिग्ट यांनी देखील रिचर्ड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डोनर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० साली न्यूयॉर्कमध्ये झाला होता. सुरवातीला त्यांना अभिनेता बनण्याची इच्छा होती. पण १९५० साली त्यांना डेसिलुची जाहीरात करण्याची संधी मिळाली. टीव्ही क्षेत्रात सुद्धा १२५ क्लासिक शोसाठी त्यांनी दिग्दर्शन केलं. यात हॅव गन-विल ट्रॅव्हल, द फ्यूगिटीव्ह, गेट स्मार्ट, म मॅन फ्रॉम अंकल, द वाईल्ड वेस्ट, द ट्विलाईट झोन अशा अनेक मालिका खूप प्रसिद्ध झाल्या.